वेंगुर्ला प्रतिनिधी- जागतिक महिला दिनानिमित्त लिनेस क्लब वेंगुर्ला व टांककर शेटये ट्रस्ट यांच्यावतीने वेंगुर्ला येथील ग्रामीण रुग्णालयात सुदृढ माता व बालक स्पर्धा घेण्यात आली. यात सहभागी झालेल्या ६० मुले व ५८ महिलांची शारीरिक तपासणी व बौद्धिक चाचणी घेण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/अभिषेक-बच्चन-यांच्या-हस्/
स्पर्धेमध्ये १ ते ३ वयोगटात सारक्षा तांडेल, राघव पोवार, आराध्य केरकर, विशाल राणे व सय्यान साठी, ४ ते ६ वयोगटात तेजस्वी तुळसकर, आत्रेया आचार्य, शुभ्रा भगत तर सुदृढ मातांमध्ये अश्विनी राणे, निशा केरकर, गौरी रगजी, मानसी भगत व मधुरा कदम या विजेत्यांना रोख पारितोषिके व आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तसेच उपस्थित सर्व महिला व बालकांना खाऊ व भेटवस्तू देण्यात आल्या.
उद्घाटन डॉ.स्वप्नाली माने-पवार व लिनेस अध्यक्ष अॅड. सुषमा प्रभू खानोलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. सुप्रिया रावळ, लिनेस ट्रेझरर कविता भाटिया, लिनेस मंदाकिनी सामंत, अंजली धुरी, बिना भाटीया, स्मिता कोयंडे, नर्स तांडेल, टेक्निशियन साळगांवकर, अंगणवाडी सेविका साधना कोणेकर, बागवे, अल्फिना बादेर, आरेकर, उज्वला पालव, चव्हाण, कांबळे, फाटक उपस्थित होत्या.
फोटोओळी – सुदृढ माता व बालक स्पर्धेदरम्यान अॅड.सुषमा खानोलकर यांनी मार्गदर्शन केले.



[…] वेंगुर्ला प्रतिनिधी- नेहरु युवा केंद्र सिधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान यांच्यातर्फे जनता विद्यालय तळवडे येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय समुह नृत्य स्पर्धेत उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकाविला.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सुदृढ-बालकांमध्ये-सार… […]
[…] ग्रामविकास विभागांतर्गत आरोग्य सेविकांची १० हजार पदे भरली जाणार आहेत. त्या भरतीत एन.आर.एच. एम.अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात केली.त्या मागणीबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मकता दर्शविली.त्याबद्दल एन. एच. एम. राज्य संघटनेचे अध्यक्ष किरण शिंदे ,उपाध्यक्ष स्वनिल गोसावी यांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सुदृढ-बालकांमध्ये-सार… […]